खालापूर | प्रतिनिधी : राहुल जाधव
साप्ताहिक खालापूर वार्ताचा ५ वा वर्धापन दिन व संपादक सुधीर माने यांचा ५५ वा वाढदिवस सोहळा वावोशी येथे बौद्ध पौर्णिमेनिमित्त उत्साहात पार पडला. कार्यक्रमात न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
या सोहळ्याला माजी नगराध्यक्ष डॉ. सुनील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अनेक मान्यवर उपस्थित होते. समाजसेवा, शिक्षण, पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना समाज भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थितांनी वृत्तपत्र सशक्त करण्यावर भर देण्याचे आवाहन केले. शेवटी विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करून सामाजिक भान जपले.
सूत्रसंचालन मानसी कांबळे, आभार सुधीर देशमुख यांनी मानले.
