• Sun. Jul 6th, 2025

रविवार दिनांक २१ जून २०२०

ज्येष्ठ कृष्ण अमावस्या

मुंबई येथील ग्रहणस्थिति स्पर्श : १०:०१
मध्य  ११:३८
मोक्ष  १३:२८
पर्व      ३:२७
पुण्यकाल :- ग्रहणस्पर्शापासून मोक्षापर्यंतचा काल हा पुण्यकाल मानावा.

ग्रहणाचा वेध :- हे ग्रहण दिवसाच्या दुसऱ्या प्रहरात असल्यामुळे शनिवारी २० जूनच्या रात्री १० पासून २१ जूनच्या दिवशी ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत.
बाल, वृद्ध, आजारी, अशक्त व्यक्ती व गर्भवती स्त्रियांनी दिनांक २१ च्या पहाटे ४:४५ ( पावणे पाच ) पासून ग्रहणमोक्षापर्यंत वेध पाळावेत.

वेधामध्ये भोजन करू नये. स्नान, नित्यकर्म, देवपूजा, श्राद्ध ही कामे  करता येतात. वेधकाळात आवश्यक असे पाणी पिणे, मलमुत्रोत्सर्ग, झोप इत्यादी कामे करता येतात.
ग्रहण पर्व काळात मात्र म्हणजे सकाळी १०.०१ ते १३:२८ पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग  झोपणे ही कामे करू नयेत.

ग्रहणातील कृत्ये :

ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे. पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण ग्रहणात करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. (पर्वकाळामध्ये) ग्रहणकाळामध्ये, पर्व कालामध्ये झोप, मलमूत्रोत्सर्ग, अभ्यंग, खाणे पिणे व कामविषयसेवन ही कामे करू नयेत. अशौच असता ग्रहणकालात ग्रहणासंबंधी स्नान, दान करण्यापूर्ती शुद्धी असते.

ग्रहणाचे राशी परत्वे फल :

*शुभ फल :- मेष, सिंह, कन्या, मकर
*मिश्र फल :- वृषभ, तुला, धनु, कुंभ
*अनिष्ट फळ :- मिथुन, कर्क, वृश्चिक, मीन
*ज्यांना अनिष्टफल आहे त्यांनी व गर्भवती महिलांनी हे ग्रहण पाहू नये.

मंत्र तंत्र पुरश्चरण संबंधी

नवीन मंत्र घेण्यास व गृहीत मंत्राचे पुनश्चरण करण्यास सूर्लग्रहण हा मुख्यकाल आहे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण ग्रहण पर्वकाळामध्ये केल्याने मंत्रसिद्धी होते.

ग्रहण पाहताना घ्यावयाची काळजी

खंडग्रास सूर्यग्रहण पाहताना ग्रहण पाहण्याकरिता तयार केलेले विशेष चष्मे किंवा काजळी लावलेली काळी काच किंवा सूर्याचे प्रखर किरण डोळ्यांपर्यंत पोचू नयेत याकरिता उपलब्ध साधनांचा वापर करून ग्रहण पाहावे.
————————————

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.