गणिताची प्राध्यापक होण्याची इच्छा
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) येथील गणेशकॉलनीतील रहिवासी सौ. शोभा सुरेश सांखला यांची मुलगी व महात्मा गांधी महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. क्रांती जैन ही ८७.६१% गुण मिळवून घवघवीत यश मिळविले आहे.
या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन ऍड. संदीपभैय्या पाटील, सचिव डॉ. स्मिताताई पाटील, प्राचार्य डॉ. डी. ए. सुर्यवंशी, उपप्राचार्य बी. एस. हाडपे, प्रा. पी. आर. बोरसे, प्रा. आर. आर. बडगुजर, प्रा. बोरसे, प्रा. डॉ. दिलीप तायडे, राज्य अन्याय विरोधी जनजागृती मंचचे प्रदेशाध्यक्ष सुभाष सांखला यांच्यासह तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
तिला तिच्या यशामध्ये कै. इंदरचंदजी ओस्तवाल तसेच आजी विमलबाई ओस्तवाल यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मामा प्रा. प्रवीण जैन यांच्यासह आई वडीलांचे विशेष मार्गदर्शन लाभले. ती आर. सी. बाफना ज्वेलर्सचे कर्मचारी सुरेश पन्नालाल सांखला यांची मुलगी आहे. कु. क्रांती हिला गणित विषयात डॉक्टरेट करून प्राध्यापक व्हायचे असल्याचे तिने बोलताना सांगितले.