• Sat. Jul 5th, 2025

कुणबी पाटील समाज सामाजिक सभागृह भूमिपूजनप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

धरणगाव/जळगाव (साथीदार वृत्तसेवा) कुणबी समाज मंगल कार्यालय हे एकत्र विचारमंथन करण्याचे स्थान ठरेल. कुणबी समाज हा मेहनती, कष्टकरी आणि आत्मविश्वासाने भरलेला समाज आहे. या सामाजिक मंगल कार्यालयाच्या माध्यमातून आपली एकजूट आणि सामूहिकता अधिक बळकट होईल. सामाजिक कार्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नसून या सामाजिक कार्यामुळे आत्मिक समाधान मिळत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. ते धरणगाव येथे समस्त कुणबी पाटील समाज पंचमंडळ आयोजित डॉ. हेडगेवार येथे  कुणबी समाज मंगल कार्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माधवराव पाटील हे होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कुमारी गायत्री गणेश पाटील हिने सामाजिक मंगल कार्यालयासाठी चाळीस लाखाचा निधी दिल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना धन्यवाद देवून पंचमंडळ करीत असलेल्या कार्याची सविस्तर माहिती विशद केली. सूत्रसंचालन लक्ष्मण पाटील सर यांनी केले. आभार दिनेश पाटील यांनी मानले.

याप्रसंगी कुणबी पाटील पंच मंडळ अध्यक्ष माधवराव पाटील, उपाध्यक्ष दिलीप पाटील, सचिव महेश पाटील, खजिनदार लक्ष्मण पाटील, उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील, भीमराज पाटील, गणेश पाटील, अप्पा पाटील, किशोर पाटील, बुटा पाटील, दत्तू पाटील, कैलास पाटील,जितू पाटील,परशुराम पाटील,राजेंद्र पाटील, मोहन पाटील, चुडामन पाटील, मंगेश पाटील, आनंद पाटील, दिनेश पाटील, वाल्मीक पाटील, बुट्या पाटील व सर्व कुणबी पाटील समाज तसेच तुकाराम बीज उत्सव समितीचे सर्व कार्यकर्ते, तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील, प्रेमराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील भानुदास विसावे, शहरप्रमुख विलास महाजन, पप्पू भावे, विजू महाजन, ऍड. वसंतराव भोलाणे, रवी कंखरे, रवी महाजन, विनायक महाजन, पवन महाजन यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.