• Sun. Jul 6th, 2025

जून महिन्याचा ‘लोकराज्य’  प्रकाशित; ऑनलाइन उपलब्ध

मुंबई – (साथीदार वृत्तसेवा)
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून या प्रयत्न आणि उपाययोजनांचा आढावा घेणारा ‘लोकराज्य’ विशेषांक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रसिद्ध केला आहे. लोकराज्य’ चा हा जून महिन्याचा ‘विशेषांक डिजिटल स्वरूपात असून वाचकांना तो विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात आला आहे.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या विविध उपाययोजना, ‘मिशन बिगिन अगेन’, उद्योगांना चालना, कृषी, शिक्षण व इतर विभागांचे महत्त्वपूर्ण निर्णय, कोरोनावर मात करणाऱ्यांच्या यशकथा, नाविन्यपूर्ण उपक्रम, कोरोनाबाबत माहिती, डिजिटल प्लॅटफॉर्म, समाजमाध्यमे, महत्त्वाच्या घडामोडी, मंत्रीमंडळाचे आणि शासनाचे निर्णय आदींची माहिती ‘लोकराज्य’च्या या अंकात देण्यात आली आहे. ९२ पृष्ठांचा हा विशेषांक पीडीएफ स्वरुपात विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात आला आहे.

जून महिन्याचा ‘लोकराज्य’ विशेषांक वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
https://mahasamvad.in/?p=15526

(राज्य सरकारच्या महासंवाद पोर्टलवरून साभार पुनर्प्रकाशित)

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.