• Sun. Jul 6th, 2025

दिलासादायक : राज्यात करोना रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५० टक्क्यांवर

सध्या ५५ हजार ६५१ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५०.४९ टक्के एवढा आहे. राज्यात आज दि. १९ जून रोजी १९३५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, एकूण संख्या ६२ हजार ७७३ झाली आहे. दरम्यान, आज दि. १९ जून रोजी करोनाच्या ३८२७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, सध्या राज्यात ५५ हजार ६५१ रुग्णांवर (ॲक्टिव) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात सध्या ६० शासकीय आणि ४३ खासगी अशा एकूण १०३ प्रयोगशाळा करोना निदानासाठी कार्यरत आहेत. दि. १९ जूनपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ३५ हजार ६७४ नमुन्यांपैकी  १ लाख २४ हजार ३३१ नमुने पॉझिटिव्ह (१६.९ टक्के) आले आहेत. सध्या राज्याचे प्रति दशलक्ष प्रयोगशाळा नमुन्याचे प्रमाण ५३१७ एवढे असून, हे प्रमाण देशपातळीवर ४२१० एवढे आहे. राज्यात ५ लाख  ९१ हजार  ४९ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या २५ हजार ६९७ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यात १४२ करोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद आज दि. १९ जून रोजी एकूण १४२ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्यमंडळनिहाय मृत्यू असे : ठाणे-१२४ (मुंबई ११४, ठाणे २, वसई-विरार ५, रायगड ३), नाशिक-९ (नाशिक, धुळे, जळगाव प्रत्येकी ३), पुणे-१ (सोलापूर १), औरंगाबाद-८ (औरंगाबाद ८).

आज, १९ जून रोजी नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ८९ पुरुष तर ५३ महिला आहेत. एकूण नोंद झालेल्या १४२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७४ रुग्ण आहेत, तर ५७ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. यामध्ये ११ जण ४० वर्षांखालील आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ५८९३ झाली आहे.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.