लासुर ता.चोपडा (साथीदारवृत्तसेवा) येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. महाशिवरात्री उत्सवाचे औचित्य साधत पूर्व संध्येला आज दि.१४ फेब्रुवारी रोजी सुप्रसिद्ध भजन प्रवाहक श्री नारायण ओझा यांच्या अमृतवाणीतून शिव भजनांचा कार्यक्रम फॉरेस्ट ग्राउंड येथे आयोजित करण्यात आला आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी सायंकाळी गावातील पारच्या मारोती मंदिर ते श्री नाटेश्वर मंदिर पर्यंत वाजतगाजत “भोले की बारात” मिरवणूक निघणार आहे यात विविध आरास देखील साकारण्यात आले आहे.त्यानंतर श्री नाटेश्वर मंदिरावर शिव पार्वती विवाह सोहळा पार पडणार आहे. दि.१६ रोजी महाप्रसादाचे आयोजन श्री क्षेत्र नाटेश्वर मंदिरावर करण्यात आले आहे.महाशिवरात्री उत्सवास ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील भाविकांना उपस्थितीचे आवाहन श्री नाटेश्वर भाविक मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
