• Sat. Jul 5th, 2025

चोपडा महाविद्यालयात ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री’ यांच्या जयंतीदिनी विविध कार्यक्रम

Loading

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात ‘महात्मा गांधी अभ्यास व संशोधन केंद्र’ तसेच ‘राष्ट्रीय सेवा योजना’ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. बी. सूर्यवंशी हे उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डी. एम. पाटील, डॉ. डी. पी. सपकाळे, श्रीमती एम. टी. शिंदे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व्ही. पी. हौसे,  महिला सहाय्यक कार्यक्रम अधिकारी व महात्मा गांधी अभ्यास व संशोधन केंद्र प्रमुख सौ. एस. बी. पाटील, डॉ. व्ही. आर कांबळे, डॉ. पी. एन. सौदागर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
     

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी महात्मा गांधी यांच्या विचारातून संपूर्ण भारत देश स्वच्छ ठेवण्याची सर्व विद्यार्थ्यांनी व मान्यवरांनी शपथ घेतली.    
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. एस. बी. पाटील यांनी केले. त्यात त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांनी केलेला त्याग व समर्पणाची भावना याचा विसर न पडता तरुण पिढीसमोर त्यातून एक आदर्श निर्माण व्हावा यासंबंधीची पार्श्वभूमी व कार्यक्रमाचा उद्देश त्यांनी आपल्या प्रास्ताविकेतून मांडला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भावना कोळी या विद्यार्थिनीने महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या जीवनावर आधारित देशभक्तीपर गीत सादर केले. यानंतर महाविद्यालयातील गंगा करणकाळे, दीपाली राजपूत, मोनाली राजपूत, पिंट्या बारेला या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्यावर प्रकाश टाकत आपले मनोगत व्यक्त केले.
   

निबंध स्पर्धेचे आयोजन

यावेळी महात्मा गांधी अभ्यास व संशोधन केंद्रातर्फे विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेसाठी ‘ महात्मा गांधी विचारांची आजच्या काळातील गरज’ हा विषय देण्यात आला होता. या स्पर्धेमध्ये एकूण ३६ निबंध विद्यार्थ्यांनी सादर केले. या निबंधांपैकी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. सोनवणे यांनी आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करतांना विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. तसेच महात्मा गांधी यांचे विचार व थोर पुरुषांना समजून घ्यायचे असतील तर वाचनातून समजून घ्यावे. यासाठी त्यांनी महाविद्यालयातील महात्मा गांधी अभ्यास व संशोधन केंद्राला भेट देवून यात असलेली पुस्तके वाचण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
      

याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना उपप्राचार्य डॉ. ए. बी. सूर्यवंशी यांनी महाविद्यालयातील विविध कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे तसेच आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असावे. महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत निर्माण करण्यासाठी प्रत्येक युवकाने आपली भूमिका पार पाडावी व थोर पुरुषांचे विचार आचरणात आणून कृती करावी, असे मत व्यक्त केले.
   

यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करून श्रमदानात आपले योगदान दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज माळी याने केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.