• Wed. Feb 4th, 2026

पालीवाल महिला मंडळाचा संक्रांत  महोत्सव उत्साहात

नाशिक (साथीदार वृत्तसेवा) येथील पालीवाल समाज महिला मंडळाच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही संक्रांत सणानिमित्त हळदी-कुंकू, वाण वितरण, खेळाचे मनोरंजक कार्यक्रम व पतंग महोत्सव साजरा करण्यात आला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती विजयाताई पालीवाल होत्या. त्यांच्या शुभ हस्ते मंडळाच्या सल्लागार सौ. किरण अनिलकुमार  पालीवालद्वारा मुद्रित हिन्दी मराठी आरती संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी समाजातील दिवंगत स्व. श्रीमती कुसुमताई पालीवाल, श्री. छोटूसिंहजी मंडलोई, स्व. महेंद्र पालीवाल, स्व. ललेशभाई कानूनगो आदींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हा मकर संक्रांत मिलन कार्यक्रम सौ. ज्योती गणेश पालीवाल यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता.

यावेळी आगामी काळात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना महिला सबलीकरण व संघटना कार्यक्रमावर उपस्थित महिलांनी आपले विचार मांडले. अल्पोपाहार व आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.