• Sun. Dec 29th, 2024

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात जळगाव ग्रामीण मतदारसंघात 85 कोटीची कामे मंजूर

ग्रामीण भागातील 63 किमी रस्त्याचा होणार कायापालट

धरणगाव (साथीदार वृत्तसेवा) पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा पहिला व दुसरा टप्पा यशस्वी झाला असून, तिसऱ्या टप्प्यालाही मान्यता मिळालेली आहे. ना. गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात 63  किमीच्या रस्त्यांसाठी 80 कोटी 42 लक्ष व देखभाल दुरुस्तीसाठी 5 कोटी असा एकूण सुमारे 85 कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील रस्त्यांचा काय पालट होणार असल्याने शेतकरी व ग्रामस्थांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना धन्यवाद दिले आहे. 

पालकमंत्री यांनी मुख्यमंत्री एकनाथ‎ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र‎ फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश‎ महाजन यांचे आभार मानले आहेत.‎ या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दोन स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मंजूर कामे
मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील धरणगाव तालुक्यात  प्रजिमा – 81 पष्टाने  खु. ते साळवा रस्ता ( 5.50 किमी  – 6 कोटी) , कंडारी बु. ते  श्यामखेडा ते भोणे रेल्वे स्टेशन रस्ता  (4.28 किमी – 5 कोटी 33 लक्ष), सोनवद खु. ते हनुमंतखेडा खु. रस्ता ( 360 किमी – 3 कोटी 58 लक्ष), प्रजिमा – 83 भामर्डी ते बाभूळगाव रस्ता (2.41 किमी – 3 कोटी 25 लक्ष), वाकटूकी ते चमगाव रस्ता (5 किमी – 8 कोटी 47 लक्ष),  इजिमा – 50 चोरगाव ते खामखेडा रस्ता (2.32 किमी – 2 कोटी 58 लक्ष), प्रजिमा – 52 पिंपळेसिम ते बोरखेडा रस्ता ( 2.67 किमी – 2 कोटी 83 लक्ष), पथराड बु. ते प्रजिमा – 04 रस्ता (2.20 किमी – 1 कोटी 95 लक्ष) तर जळगाव तालुक्यातील  कुसुंबा ते धानवड तांडा रस्ता ( 8 किमी – 8 कोटी 57 लक्ष ), रामदेववाडी ते कुऱ्हाडदे रस्त     (4 किमी – 4 कोटी 83 लक्ष), जवखेडा ते सुभाषवाडी रस्ता (3 किमी – 5 कोटी 28 लक्ष), डोमगाव ते बोरणार रस्ता ( 4 किमी – 5 कोटी 5 लक्ष),   कानळदा ते विदगाव रस्ता ( 3.65 किमी – 4 कोटी 08 लक्ष), आसोदा ते नांद्रा खु. तालुका बोर्डर पर्यंत  रस्ता (8 किमी – 13 कोटी 26 लक्ष), तसेच सुजदे ते भोलाणे तालुका बोर्डर पर्यंत  रस्ता (4 किमी – 5 कोटी 29  लक्ष) असा एकूण 80 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.

जळगाव ग्रामीण मतदारसंघात 15 रस्त्यांच्या 63 किमी रस्त्यांसाठी 80 कोटी 42 लक्ष 46 हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे व देक्षभाल दुरुस्तीसाठी 5 कोटी 28 लक्ष एकूण सुमारे 85 कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील रस्त्यांचा काय पालट होणार असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विषयी समाधान व्यक्त होत आहे. यांनी मुख्यमंत्री एकनाथ‎ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र‎ फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश‎ महाजन, पालकमंत्री गुलाबराव‎ पाटील यांचे आभार मानले आहेत.‎

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ग्रामीण भागासाठी वरदान!
योजनेचा पहिला व दुसरा टप्पा यशस्वी झाला असून, तिसऱ्या  टप्प्यालाही मान्यता मिळालेली आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील रस्तेखऱ्या अर्थाने दर्जेदार होत आहे. प्रत्येक किलोमीटरसाठी 1 कोटीपेक्षाही जास्त निधीची तरतूद असून मक्तेदारावर 5 वर्षांसाठी देखभाल दुरुस्तीची जबाबदारी निश्चित केली गेली आहे. या योजनेत रस्त्यांचे काम दर्जेदार‎ होणार असून गावांतर्गत काँक्रीट रस्ते,‎ आवश्यक तेथे पूल, संरक्षक भिंती‎ आदी कामांचा समावेश असल्यामुळे परिपूर्ण रस्त्याचा विकास होणार आहे. जिल्ह्यातील गावे आणि वाड्या-वस्त्यांची जोडणी करण्यासाठी ही योजना लाभदायक व वरदान ठरत आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना कार्यान्वित करण्यात आली असून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ही ग्रामीण भागासाठी वरदान ठरत आहे.
– गुलाबराव पाटील, पालकमंत्री, जळगाव जिल्हा

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.