वाडा (अनिल पाटील) समाजसेवक नरेश जाधव यांना त्यांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल समाजरत्न पुरस्काराने नुकतेच वाडा येथे देऊन सन्मानित करण्यात आले.
वाडा तालुक्यातील आदीशक्ती मुक्ताई ज्ञानप्रसारक मंडळ वाडा व प्रेरणा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रकृती, संस्कृती, अन्नदाता आणि जलविज्ञान या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार देवून जाधव यांचा गौरव करण्यात आला.
नरेश जाधव यांनी काही वर्षांच्या कालावधीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या कार्याचा ठसा पालघर जिल्ह्यात उमटवला आहे. त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.