माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या प्रमुख उपस्थितीत टेम्पो रवाना
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील यांच्या सूचनेनुसार तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी तातडीने पुरग्रस्त बांधवासाठी चाळीसगावचे माजी आमदार राजीवदादा देशमुख यांच्याकडे ही मदत रवाना केली. याप्रसंगी करण्यात आलेल्या मदतीत पूरग्रस्तांसाठी गहु, ज्वारी, बाजरी, तांदुळ टेम्पोद्वारे चाळीसगावसाठी पाठविण्यात आले.

यांची प्रमुख उपस्थिती
या वेळी अरुणभाई गुजराथी, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, पिपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी, व्हाइस चेअरमन प्रवीणभाई गुजराथी, डाॅक्टरसेलचे तालुकाध्यक्ष डाॅ. कांतिलाल पाटील, सेवादलाचे तालुकाध्यक्ष डाॅ. विजयसिंह पाटील, व्हीजीएनटी सेलचे तालुकाध्यक्ष राजेंद्र धनगर, जिल्हा युवक उपाध्यक्ष सनी सचदेव, शहर अध्यक्ष शामभाउ परदेशी, विद्यार्थी तालुका उपाध्यक्ष सौरव ठाकरे, माजी जि. प. सदस्य बाळासाहेब पाटील, पंचक तन्टामुक्ती अध्यक्ष आबा सोये आदी मान्यवर उपस्थित होते.