अकाउंट विषयात ९९ गुण; सीए होण्याचा मानस
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) येथील नवकार फूड्सचे संचालक सुनील भवरलाल जैन यांची मुलगी व महात्मा गांधी महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. नेतल सुनील जैन हीने १२ वी वाणिज्य विभागात ८६% गुण मिळवून घवघवीत यश मिळवले. विशेष म्हणजे, नेतलने अकाउंट विषयात १०० पैकी ९९ गुणासह विषेश यश संपादन केले.
या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन ऍड. संदीपभैय्या पाटील, सचिव डॉ. स्मिताताई पाटील, प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी, उपप्राचार्य बी. एस. हाडपे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. सी. आर. देवरे, प्रा. दीपक करणकाळ, प्रा. सायली जैन, प्रा. सौरभ जैन, प्रा. श्रुतम अग्रवाल, प्रा. उज्वला भट, प्रा. व्ही. डी. शिंदे सर यांच्यासह सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
नेतलला प्रा. प्रवीण जैन, आनंद जैन, इलीयास पटेल सर यांच्यासह आई वडीलांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कु. नेतल जैनला पुढे सी. ए. करायचे आहे असे तिने बोलताना सांगितले. ती पत्रकार लतीश जैन यांची पुतणी आहे.