जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. जिल्ह्यात दि. २२ जून सायंकाळी प्राप्त अहवालात नवीन ८१ करोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये जळगाव शहर, जामनेर, रावेर व बोदवड येथे जास्त रुग्ण आढळून आले.
दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णाची संख्या २४८३ इतकी झाली. यात ९० करोनाबाधित जळगाव जिल्ह्याबाहेर उपचार घेत आहेत. दि. २२ जून रोजी जळगाव शहर २०, जळगाव ग्रामीण ४, अमळनेर ३, चोपडा १, भडगाव १, धरणगाव ७, जामनेर १५, रावेर १०, बोदवड २० असे एकूण ८१ करोनाबाधित आढळले आहेत.
चोपड्यात केवळ एक पॉझिटिव्ह चोपडा तालुक्यातील सोमवार दि. २२ जून रोजी सायंकाळी प्राप्त १२ अहवालात ११ निगेटिव्ह तर १ कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तो नागलवाडी येथील असून, आज, २२ जून रोजी ४६ जणांचे स्वब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. चोपडा तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या २०१ झाली असून, त्यापैकी १०५ जणांनी कोरोनावर मात केल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.