• Sun. Jul 6th, 2025

रोटरी क्लब चोपडातर्फे ‘न्यू मेंबर्स ओरियनटेशन’वर सेमिनार

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) नवीन रोटरी सदस्यांसाठी “घराघरात रोटरी पोहोचवायची आहे मनामनात रोटरी रुजवायची आहे” या विचारांच्या ध्यास घेऊन रोटरी जळगाव रुरल एन्क्लेव व रोटरी क्लब चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन सभासदांसाठी रोटरी क्लब च्या कार्यविस्तार आणि उद्देश पूर्तीसाठी ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जळगाव येथील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. प्रदीप जोशी उपस्थित होते. नवीन सभासदांसाठी रोटरीची नियमावली, सेवा संस्कार व रोटरीचे विविध क्षेत्रात असणारे सेवाभावी कार्य याविषयी डॉ. प्रदीप जोशी यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.

कार्यशाळेतील रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे प्रांतपाल शब्बीर शाकीर उपस्थित होते. मित्रता, नेटवर्किंग, नैतिकता आणि सेवा या रोटरीच्या मूल्यांवर आधारित आपल्या खुमासदार शैलीत माननीय शब्बीर शाकीर यांनी आपल्या मनोगताने सर्व रोटरी बांधवांची मने जिंकली.

सदर कार्यशाळेत रोटरी जळगाव रुरल एन्क्लेवचे राहुल कुलकर्णी, पी. डी. जी. राजे संग्रामसिंह भोसले तसेच सह – प्रांतपाल योगेश भोळे, संकेत छाजेड, धर्मेंद्र मेंडकी, पूनम गुजराती उपस्थित होते. सोबतच कार्यशाळेचे मुख्य आयोजक रोटरी क्लब चोपडा चे अध्यक्ष नितीन अहिरराव व सहआयोजक रोटरी क्लब अमळनेर अध्यक्ष अभिजीत भांडारकर, चाळीसगाव रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन पाटील तसेच रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीचे अध्यक्ष संदीप जोशी तर रोटरी क्लब ऑफ चोपडा, अमळनेर, चाळीसगाव, भुसावळचे रोटरी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चोपडा रोटरी क्लबचे प्रेसिडेंट नितीन अहिरराव यांनी प्रास्ताविक तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ. आशा वाघजाळे यांनी करून दिला, तर सचिव रुपेश पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव महाले यांनी केले.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.