• Sat. Jul 5th, 2025

सव्वा लाखांची लाच घेताना जळगाव प्रांताधिकाऱ्यांसह तिघांना अटक

प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये खळबळ

जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) पोलीस ठाण्यात जप्त केलेले वाळूचे ट्रक सोडण्यासाठी एक लाख पंचवीस हजारांची लाचेची मागणी करुन खाजगी पंटरमार्फत ती स्वीकारणाऱ्या जळगावच्या प्रांताधिकारी दीपमाला जयपाल चौरे (वय ३६ रा. सागरपार्क समोर शासकीय निवासस्थान) यांच्यासह त्यांच्या लिपिक अतुल अरुण सानप (वय ३२ रा. मेहरुण) या दोघांना जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आज, शुक्रवारी २१ रोजी पथकाने ही कारवाई केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक नीलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपअधीक्षक जी. एम. ठाकूर, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलीस कॉन्स्टेबल अशोक अहिरे, पोलीस नाईक मनोज जोशी, सुनील शिरसाठ, प्रवीण पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.