कोरोनाच्या रुग्णांसाठी चोपडा शहरातील दानशूरांचा पुढाकार
चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) उपजिल्हा रुग्णालयात अतिशय चांगली व्यवस्था आहे. परंतु रुग्णाच्या बेडला जोडणारी संयुक्त ऑक्सिजन पाईपलाईन नाही. अशावेळी येथे उपचार घेणाऱ्या बऱ्याच रुग्णांना जळगाव येथे हलवावे लागते. अथवा नाशिकला पाठवावे लागते.
सध्या जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने भारतासह महाराष्ट्रातही पाय पसरविले आहेत. जळगाव जिल्ह्यातही कोरोना बाधित वाढत असल्याने त्यांना ऑक्सिजन पुरवठा आवश्यक आहे. चोपड्यातदेखील कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा औषधी पेक्षाही महत्वाचा आहे.

अडावद येथील एका रुग्णाचा ऑक्सिजन पुरवठा न मिळाल्याने मृत्यू झाल्याचे त्यांचा मुलगा डॉ. जुनेद व डॉ. दीपक पाटील यांनी शेतकरी कृती समितीचे एस. बी. पाटील यांना सांगितले. यावर उपाय म्हणून, चोपडाच्या सर्व डॉक्टरांची झूम बैठकीत चर्चा झाली. या चर्चेत डॉ. दीपक पाटील, डॉ. दिलीप पाटील, डॉ. लोकेन्द्र महाजन, डॉ. विनीत व डॉ. अमित हे हरताळकर बंधू, डॉ. राजेंद्र भाटिया, डॉ. सुनील देशपांडे, डॉ. नरेंद्र शिरसाठ यांनी सहभाग घेतला. करोनाबाधितांची संख्या कमी करण्यासाठी अनेक उपाय यावेळी सुचविण्यात आले.
डॉ. पंकज पाटील यांनी चोपडा कोविड सेंटरमध्ये लोकसहभागातून ऑक्सिजन काँसेंट्रेटर आणि प्रत्येक बेडला O२ ची व्यवस्था जर झाली, तर कोरोना रुग्णांना जळगाव येथे पाठवण्याची शक्यता कमी होईल, असे सुचविले. यानुसार चोपड्यातील अनेक दाते पुढे आले आणि सुरू झाला मदतीचा ओघ.
यामध्ये पुढील दात्यांनी आपापल्या परीने मदत केली.
(१)डॉ महेंद्र जैस्वाल…. ₹५०००/-
(२)ए पी आय मनोज पवार…. ₹५०००/-
(३)श्री सी एस पाटील….. ₹२१००/-
(४)डॉ विनीत/अमित हरताळकर..₹१००००/-
(५)श्री भरत पाटील (गणपूर/कतार)..₹१००००/-
(६) श्री नंदकिशोर सोनवणे….. ₹१०००/-
(७)श्री संजय बोरसे, वेलोदे. …. ₹५००/-
(८)बापुसो कैलास पाटील माजी आमदार..₹५०००/-
(९)श्री सुनील जैन…. ₹१००००/-
(१०)तहसीलदार अनिल गावित… ₹११०००/-
(११)डॉ रवींद्र पाटील,पंकजनगर…₹११००/-
(१२)डॉ पराग पाटील, चहार्डी…… ₹११००/-
(१३)डॉ सुशील सूर्यवंशी….. ₹११००/ (१४)भागवत महाजन(गोरगावले)..₹५०००/-
(१५)डॉ अजय करंदीकर…. ₹११००/-
(१६)डॉ संदीप काळे… ₹११००/-
(१७)चंद्रशेखर करंदीकर(गणपुर/पुणे)₹५०००/-
(१८) विजय पुंडलिक पाटील(मुंबई)..₹५०००/-
(१९)डॉ दीपक (साई), डॉ दिलीप नाना…₹१००००/-
(२०)डॉ नरेंद्र शिरसाठ…₹५०००/-
(२१)श्री नारायण पालीवाल…₹२१००/-
(२२)श्री हेमंत पाटील सर…..₹१०००/-
(२३)डॉ भूषण सोनवणे….₹३०००/-
(२४)ऍड. दिनेश वाघ (बुधगाव)..₹५००/-
(२५)डॉ राजेन्द्र भाटिया….₹३५००/-
(२६)डॉ लोकेंद्र महाजन…₹५०००/-
(२७)श्री मयुर शिंदे….₹९११/-
आतापर्यंत एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये जमा झाले आहेत. शुक्रवारी दि. १९ जून रोजी ही रक्कम तहसीलदार अनिल गावित यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उद्यापासून काम सुरू होणार असून, एका आठवड्यात जास्तीत जास्त रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करता येईल अशी व्यवस्था प्रत्यक्षात येणार आहे.
सढळ हाताने मदत करा आपणही थोडा निधी दिला तर पूर्ण रुग्णालय सुसज्ज करता येईल तरी दानशूर लोकांनी मदत करावी, असे आवाहन एस. बी. पाटील यांच्यासह सारे कोरोनामुक्त चोपडा अभियानातील कार्यकर्ते यांनी केले आहे. यासाठी मयुर शिंदे, रमाकांत सोनवणे, सी. एस. पाटील, विपीन बोरोले, कुलदीप पाटील, हरिकेश पाटील मेहनत घेत आहेत.