चोपडा (साथीदार वृत्तसेवा) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातर्फे दि. २१ सप्टेंबर २०२४ रोजी भौतिकशास्त्र विषयावर “प्रश्नमंजुषा स्पर्धेचे”, तसेच दि. १९ सप्टेंबर २०२४ रोजी “प्रज्ञाशोध स्पर्धेचे” यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी हे उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी, उपप्राचार्य डॉ. ए. बी. सूर्यवंशी, समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, पर्यवेक्षक ए. एन. बोरसे, समन्वयक पी. एस. पाडवी आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी भौतिकशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. प्रीती रावतोळे, स्पर्धा समन्वयक डॉ. व्ही. आर. हूसे, डॉ. डी. ए. तायडे तसेच ए. आर. पाटील, आर. आर. पवार, एस. पी. पाटील, सौ. डी. जी. पाटील, सौ. ए. आर. बोरसे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विभागप्रमुख डॉ. प्रीती रावतोळे यांनी कार्यक्रमाचे स्वरूप व उद्देश याबाबत माहिती दिली. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विज्ञान व तंत्रज्ञान याचा वापर जपून व सांभाळून केला पाहिजे जेणेकरून ते आपल्यासाठी ते शाप ठरता कामा नये असा संदेश दिला.
प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी यांनी अध्यक्षीय मनोगतात आधुनिक युगात नावीन्यपूर्ण गोष्टींचा स्वीकार करून स्पर्धेत टिकण्यासाठी सतत अपडेट राहण्याचा मंत्र दिला.
प्रज्ञाशोध स्पर्धेमध्ये १४० विद्यार्थ्यांचा सहभाग
दि. १९ सप्टेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध स्पर्धेमध्ये १४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेमध्ये कनिष्ठ महाविद्यालयामधून प्रथम पारितोषिक कु. रोशनी दीपक सुतार, द्वितीय पारितोषिक कु. योगिता रवींद्र कोळी व तृतीय पारितोषिक यज्ञेश प्रभाकर पाटील त्याचप्रमाणे वरिष्ठ महाविद्यालयामधून प्रथम पारितोषिक सिद्धार्थ शेखर ठाकरे, द्वितीय पारितोषिक कु. नेहा रामचंद्र मोरे व तृतीय पारितोषिक प्रतीक नरेंद्र सैंदाणे या विद्यार्थ्यांनी प्राप्त केले. तसेच याच प्रज्ञाशोध परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवणाऱ्या ४५ विद्यार्थ्यांना प्रश्नमंजूषा कार्यक्रमात सहभाग घेण्याची संधी देण्यात आली.
या प्रश्नमंजूषा स्पर्धेत पाच विद्यार्थ्यांचा एक ग्रुप करण्यात आला. यानंतर चार फेऱ्या घेण्यात आल्या. विविध फेरीतील सूत्रसंचालन डॉ. व्ही. आर. हुसे, गोपाल वाघ, निरंजन पाटील व दर्शन पाटील यांनी केले. प्रत्येक फेरीत कमी गुण असलेले ग्रुप कमी करून अंतिम फेरीत राहिलेल्या एका ग्रुपमधील प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्न विचारून त्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालयामधून प्रथम पारितोषिक जयेश श्यामसुंदर सूर्यवंशी, द्वितीय पारितोषिक कु. अनुष्का रमेश अहिरे, तृतीय पारितोषिक कु. राधा मनिलाल पावरा तसेच वरिष्ठ महाविद्यालयामधून प्रथम पारितोषिक सिद्धार्थ शेखर ठाकरे, द्वितीय पारितोषिक कु. नेहा रावसाहेब पाटील व तृतीय पारितोषिक कु. हर्षदा विनोद पाटील या विद्यार्थ्यांनी प्राप्त केले. या कार्यक्रमप्रसंगी गौरव बाविस्कर व कु. अनुष्का अहिरे या विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषेविषयी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्राजक्ता वानखेडे यांनी केले, तर आभार डॉ. डी. एस. तायडे यांनी मानले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निलेश भाट, जितेंद्र कोळी, विशाल पाटील यांचे सहकार्य लाभले.