वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमे हे समाज संतुलनाचे काम करीत असतात. अस्तित्वाच्या स्पर्धेत केवळ सनसनाटी बातम्या देऊन पोर्टल न्यूज टिकून राहू शकत नाही.
पत्रकारितेच्या या व्यवसायिक अपुर्णतेमुळे समाजाचेच उलट नुकसान होत आहे.
पत्रकारितेत सध्या शैक्षणिक नितीमुल्य आणि काही मापदंड नसल्यामुळे आणि शासनाची दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती वाढल्याने खरी पत्रकारिता धोक्यात येत आहे.
सांगोवांगी आलेल्या बातम्या, अफवा, गटबाजीतून पेरलेल्या बातम्या शहनिशा न करता सहज छापण्याची प्रवृत्ती आज वाढत आहे.
पत्रकारितेची अहर्ता किंवा लेखी परीक्षा होणे पत्रकारांसाठी गरजेचे आणि काळाची गरज बनली आहे. याकरीता शासन स्तरावरून जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी लक्ष वेधणे गरजेचे झाले आहे.
लेखक : नरेन्द्र कोवे
(या लेखाशी संपादक सहमत असेलच असे नाही, हे लेखकाचे स्वमत आहे.)