• Sat. Jul 5th, 2025

येवल्यात पाच कोटींच्या रस्तेकामांना मंजुरी

छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला शहरात राज्य शासनाच्या विशेष रस्ता अनुदान योजनेमधून ५ कोटींच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी

नाशिक (साथीदार वृत्तसेवा) येवला नगरपालिका क्षेत्रात रस्ता व तदअनुषंगिक बाबींचा विकास करण्यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ याच्या विशेष प्रयत्नांतून ‘विशेष रस्ता योजनेअंतर्गत’ ५ कोटींच्या निधी वितरीत करण्यात आला आहे. राज्य शासनाकडून मंजूर झालेल्या या कामांमुळे येवला शहरातील १९ रस्त्यांचे मजबुतीकरण व अनुषंगिक भूमिगत गटांरांची कामे मार्गी लागणार आहे. या विकास कामांमुळे येवला शहरातील स्वच्छता आणि सुशोभिकरणात अधिक भर पडणार आहे.

राज्यातील नागपालिकांना रस्ते आणि अनुषंगिक बाबींचा विकास करण्यासाठी राज्य शासनाकडून विशेष रस्ते अनुदान या योजनेतून निधी दिला जातो.या योजनेतून येवला नगरपालिकेसाठी राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या ५ कोटींचा निधीच्या माध्यमातून येवला शहराअंतर्गत एकूण १९ रस्त्यांची व भूमिगत गटारांची कामे मार्गी लागणार आहे. यामध्ये येवला शहरातील अलमगीर यांचे घर ते एजाज मेंबर यांच्या घरापर्यंत भुमीगत गटारासह रस्ता काँक्रिटीकरण, रिजवान मेंबर ते ए.डी. शेख यांच्या घरापर्यंत भुमीगत गटारासह रस्ता काँक्रिटीकरण, बबलु चायवाला ते शफीक पहीलवान यांचे घरापर्यंत भुमीगत गटारासह रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी प्रत्येकी १० लक्ष, जाहगीरदार कॉलनी सादीक चमडेवाले ते अन्दरभाई मुर्गीवाले येथे भुमीगत गटारासह रस्ता खडीकरण व डांबरीकरण, तिन देऊळ ते प्रकाश सावंत ते बाबर यांची गिरणीपर्यंत भुमीगत गटारासह रस्ता काँक्रिटीकरण, नांदगांव रोड भागातील जुनी स्पेक्ट्रोलाईन फॅक्टरी परिसरात भुमीगत गटारासह रस्ता खडीरकरणासह डांबरीकरण, अंबिया शाह कॉलनी भागातील अभिन्यासातील रस्ते भुमीगत गटारासह रस्ता रस्ता खडीरकरणासह डांबरीकरण तर पारेगांव रस्ता ते चारी पावेतो भुमीगत गटारासह रस्ता कांक्रिटीकरण करण्यासाठी प्रत्येकी ३० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

तसेच लक्ष्मी दाल मिल ते रुग्वेदी मंगलकार्यालय ते आझाद चौक भुमीगत गटारासह रस्ता काँक्रिटीकरण, अशोक सांबर यांच्या घरापासुन ते विनायक आहेर यांच्या घरापर्यंत भुमीगत गटारासह रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी प्रत्येकी १५ लक्ष, राठी यांचे घरापासुन ते सरदार पटेल पतसंस्था पर्यंत भुमीगत गटारासह रस्ता काँक्रिटीकरण, बजाज शोरुम ते भंडारी प्रिंटर्स पर्यत भुमीगत गटारासह रस्ता कॉक्रिटीकरण करण्यासाठी प्रत्येकी २० लक्ष, अमित विखे यांच्या घरापासुन ते राजेश भालेराव यांच्या घरापर्यंत भुमीगत गटारासह रस्ता काँक्रिटीकरण, दत्तनगर भागातील मिलन स्विट ते नितीन आहेर यांच्या घरापर्यंत भुमीगत गटारासह रस्ता काँक्रीटीकरण, बाजीराव नगर मधील दत्तमंदिर ते प्रेरणा किराणा दुकान पर्यंत भुमीगत गटारासह रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी प्रत्येकी २५ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे.

त्याचबरोबर गोशाळा कंपाऊंड लगत स.नं. १३ चे १५ अभिन्यासातील भुमीगत गटारासह सीडी वर्क व रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी ६० लक्ष,स. न. १४ पैकी माऊली लॉन्स पाठीमागील परिसरातील अभिन्यासातील रस्ते भुमीगत गटारासह रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी ३५ लक्ष, स.नं. ९३१/३ (१/२/३) व स.नं. ९० पै. अभिन्यासात रस्ते भुमीगत गटारासह रस्ता काँक्रिटीकरण, हजारे यांचे घर ते साई बिल्डर्स ते गायकवाड यांच्या घरापर्यंत भूमीगत गटारासह रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी प्रत्येकी ४० लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.