पदग्रहण सोहळा उत्साहात
जळगाव (डॉ.अनिलकुमार पालीवाल) येथील गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे रविवारी दि. 1 फेब्रुवारी रोजी पद्मालय विश्राम गृहात विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी वसंत दिलीपचंद पाटील, कार्याध्यक्षपदी मुराद पटेल तर सचिवपदी मंगल पाटील यांची, जिल्हाध्यक्ष म्हणून चेतन रवींद्र वाणी यांची तर शहराध्यक्ष म्हणून जितेंद्र कोतवाल यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच इतरही सदस्यांना पदाधिकारीपदी नियुक्त करण्यात आले.
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे पद्मालय विश्राम गृहात रविवारी विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मंचावर केंद्रीय अध्यक्ष नरेंद्र कदम, केंद्रीय कार्याध्यक्ष सागर ओतारी, उपाध्यक्ष रवींद्र पवार, केंद्रीय सचिव भगवान सोनार, खजिनदार ललित खरे, सदस्य गणेश पाटील, साक्री ता. धुळे येथील संघटनेच्या पदाधिकारी जोशीला पगारिया तसेच ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत यादव, डॉ. दिलीप तिवारी, राजेश यावलकर उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर प्रस्तावनेमधून, अध्यक्ष नरेंद्र कदम यांनी कार्यक्रम घेण्यामागील उद्देश्य स्पष्ट करून संस्थेची ध्येयधोरणे स्पष्ट केली.
यानंतर मान्यवरांनी आपल्या मनोगतातून संघटनेविषयी कौतुक करून पत्रकारांवर होणार्या अन्यायाला संघटनेच्या माध्यमातून एकजुट दाखवून वेळोवेळी आवाज उठवू या असे सांगितले. यामध्ये जेष्ठ पत्रकार दिलीप तिवारी, चंद्रकांत यादव, राजेश यावलकर, जोशीला पगारिया, रवींद्र पवार यांनी मनोगत व्यक्त केले. पत्रकारांच्या समस्येसह पाल्यांच्या शिक्षण, रोजगार, आरोग्याच्या दृष्टिकोनातून संघटनेच्या माध्यमातून आपण सतत कार्यरत राहूया असेही आवाहन यावेळी मान्यवरांच्या वतीने करण्यात आले.
यावेळी विविध निवड प्रक्रिया जाहीर करून मान्यवरांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यात उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी वसंतराव पाटील, कार्याध्यक्षपदी चाळीसगावचे मुराद पटेल, उपाध्यक्षपदी दीपक कुलकर्णी, सचिवपदी जळगाव तालुक्यातील मंगल पाटील, संघटकपदी राकेश विजय वाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जळगाव जिल्हाध्यक्षपदी चेतन रवींद्र वाणी, जिल्हा कार्याध्यक्षपदी हेमंत सुरेश पाटील, जिल्हा सचिवपदी वसीम शब्बीर खान यांची एकमताने निवड करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्षपदी धानोर्याचे प्रशांत सोनवणे, सुमित सुरेश देशमुख, लोहा-याचे दीपक वामन पवार, जिल्हा सहसचिव म्हणून राजेंद्र यु. पाटील, खजिनदार म्हणून पंकज शेटे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख म्हणून विश्वजीत चौधरी यांची नियुक्ती झाली. जळगाव शहर अध्यक्षपदी जितेंद्र संतोष कोतवाल तर शहर कार्याध्यक्षपदी जकी अहमद, सचिव योगेश रमेश चौधरी यांची एकमताने नियुक्ती झाली. शहर उपाध्यक्ष म्हणून पवन खंबायत, नितीन पुंडलिक सोनवणे, निखिल अशोक मोरे, सहसचिवपदी नरेश प्रधान बागडे यांची नियुक्ती झाली.
तर शहर खजिनदार म्हणून गोकुळ सोनार, शहर संघटक म्हणून भूषण हंसकर, सहसंघटक म्हणून राजेंद्र रामराव पाटील तसेच सदस्य म्हणून इकबाल पटेल यांची निवड करण्यात आली आहे. या सर्व निवड झालेल्या पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन त्यांच्यावर आगामी काळात मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे.
सर्व पदाधिकार्यांनी एकमताने, आम्ही संघटनेचे कार्य जोमाने पुढे नेऊ. पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रमांची आखणी करू असे आश्वासन यावेळी दिले. सूत्रसंचालन भगवान सोनार यांनी केले. तर आभार विश्वजीत चौधरी यांनी मांडले. कार्यक्रमासाठी गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या विविध पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
पत्रकार संघटनेच्या बैठकीला उत्स्फुर्त प्रतिसाद
जळगावनंतर नाशिक, पुणे, मुंबई यास राज्यभरात गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे संघटन वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. तसेच दर महिन्याला मीटिंग घेण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. या संघटनेच्या बैठकीस जळगाव जिल्ह्याभरासह इतर तालुक्यातील पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

केंद्रीय कार्याध्यक्ष सागरभाऊ ओतारी यांचा गौरव
याप्रसंगी दै. शौर्य मराठीचे मुख्य संपादक सागरभाऊ ओतारी यांची गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या केंद्रीय कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. सागरभाऊ ओतारी यांच्या मोठा जनसंपर्क, संघटनात्मक कौशल्य आणि पत्रकारांच्या प्रश्नांची जाण असल्याने ही निवड करण्यात आली आहे. या निवडबद्दल बोलतांना, सागरभाऊ ओतारी यांनी, गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचा राज्यभर विस्तार करत पत्रकारांच्या समस्या सोडवत त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहिल अशी ग्वाही त्यांनी दिली.

