• Sun. Feb 15th, 2026

चोपड्यात संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी

चोपडा (डॉ.अनिलकुमार पालीवाल) येथील श्री सोनार समाज संत नरहरी फाउंडेशन यांच्या वतीने संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी श्रद्धा व उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा सौ. नम्रता पाटील तसेच पोलीस निरीक्षक श्री. महेशजी टाक यांची प्रमुख उपस्थिती लाभली. संस्थेच्या वतीने त्यांचा स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमाची सुरुवात संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे व पालखीचे पूजन करून करण्यात आली. यावेळी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. समाजातील यशस्वी व्यक्तिमत्त्व श्री किशोरभाऊ दुसाने (उपसरपंच, ग्रामपंचायत घोडगाव) यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
तसेच गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कुमारी आराध्या वानखेडे व चि. जेनिल विसपुते यांना प्रशस्तीपत्र व सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी नक्षत्र ज्वेलर्स यांच्या तर्फे कै. आबासाहेब पंढरीनाथ कृष्णा शेठ अहिरराव यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा मानाचा समाजरत्न पुरस्कार श्री. शाम सुपडूशेठ वानखेडे, श्रीमती उषाताई ब्रिजलाल शेठ विसपुते व श्री. राजेंद्र पुरुषोत्तम शेठ सोनार यांना प्रदान करण्यात आला.


यावर्षी प्रथमच मानाचा समाजभूषण पुरस्कार मरणोत्तर कै. बाळकृष्ण रामजी शेठ विसपुते (उर्फ कवी कुमार) यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमानिमित्त मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. श्रीमती नलिनी मोरस्कर मॅडम यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. शैला जडे व सौ. प्राजक्ता निकुंभ यांनी केले.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष श्री विलास सोनार सर, नितीनभाऊ अहिरराव, रवींद्र वानखेडे, अनिलभाऊ वानखेडे, श्याम अहिरराव, रवींद्र विसपुते, भटू सोनार, रोहित सोनार, दीपक बागुल, श्रीराम सोनार, मुकुंदा शेठ दुसाने, श्री महेंद्र सोनार, जितेंद्र विसपुते, संदीप वाघ, प्रदीप अहिरराव, श्याम विसपुते, संजय वाघ, निलेश सोनार, अमोल वानखेडे, अजिंक्य वानखेडे, दत्तात्रय विसपुते, शैलेश विसपुते आदींनी विशेष परिश्रम घेतले.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.