लासुर ता चोपडा (डॉ.अनिलकुमार पालीवाल) येथे संत शिरोमणी रविदास महाराजांच्या जयंती निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून किसान विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल हिम्मतराव पाटील यांनी स्पष्ट केले की संत महापुरुषांचे विचार आत्मसात केले तर जिवन सुसंकृत होते. महापुरुषांचे विचार अंगीकारल्यानंतर पुढील पिढी विचारशील बनते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत शिरोमणी रविदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच नर्मदाबाई भील यांनी केले. संत रविदास यांची आरती सामूहिक पद्धतीने म्हटली गेली.
कार्यक्रमास चोपडा सुतगिरणीचे संचालक अमृतराव वाघ, माळी समाजाचे राज्याध्यक्ष प्रा ए के गंभीर, शेतकी संघाचे संचालक नारायण पाटील, विकास सोसायटी माजी चेअरमन चंद्रकांत पाटील, गोरख पाटील विकास वाघ, भिकन माळी, ह भ प बापू महाराज,सोनू लखा वाघ, सुकदेव मोतीराले, सुभाष वाघ, जितेंद्र महाजन, नारायण बागुल, दिनेश बागुल,संजय वाघ, दिनेश अहिरे , वासुदेव महाजन, नाटु महाजन हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक बागुल यांनी केले सूत्रसंचालन देवीलाल बाविस्कर सर यांनी तर आभार सुभाष वाघ यांनी मानले.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
लासुर ता चोपडा येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात दुःखमय असं वातावरण निर्माण झालेले आहे. त्या अनुषंगाने लासुर येथे अजित पवार यांना शोकसभेद्वारे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. एक कर्तव्यनिष्ठ, सामाजिक भान असलेला, राज्याची आर्थिक उन्नतीचे स्वप्न पाहणारा, क्रियाशील नेता, वेळेला महत्त्व देणारा अडलेल्या नडलेल्याची कामे करणार्या नेत्याला आपण मुकलो आहोत असे विचार श्रद्धांजलीपर शोकसभेत व्यक्त करण्यात आले. यावेळी उपसरपंच अनिल पाटील ,माळी समाजाचे राज्य अध्यक्ष प्रा. ए के गंभीर ,चोपडा सूतगिरणीचे संचालक अमृतराव वाघ, पत्रकार अजय पालीवाल, जितेंद्र महाजन, ह भ प बापू महाराज, भाजपचे भरत सोनगिरे यांनी अजित पवार यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. लासुर येथील ग्रामपंचायतच्या हॉलमध्ये ही शोकसभा आयोजित करण्यात आलेली होती.
सुरुवातीला अजित पवार यांच्या प्रतिमेस सरपंच नर्मदाबाई भिल यांनी पुष्प अर्पण केले. दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. “अजित दादा अमर रहे” या घोषणा देण्यात आल्या. यावेळी शेतकी संघाचे नारायण पाटील, पोलीस पाटील जितेंद्र पाटील, पीक संरक्षण सोसायटी चेअरमन संजय पाटील, मुस्ताक पठाण, विकास वाघ, भिकन माळी, गोकुळ पाटील, विश्वास कोळी, अशोक कोळी, सोमनाथ सोनार, प्रकाश पाटील, दीपक महाजन, सुरेश महाजन ,प्रवीण मगरे उपस्थित होते.
