सावदा (साथीदार प्रतिनिधी) सावदा येथे नेहमी विविध समाज उपयोगी विशेषत: समाजतील गरीब व गरजू महिला साठी उपक्रम राबविणाऱ्या “ताई फाउंडेशन”तर्फे गरीब गरजू महिलांना गीझर वाटप करण्यात आले.
ताई फाउंडेशनतर्फे अगदी साध्या पद्धतीने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक सपकाळे यांच्या घरी छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करून सदर प्रसंगी समाजातील ४० गरजू महिलांना या गीझरचे वाटप फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक सपकाळे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी कोणत्याही राजकीय, सामाजिक व्यक्ति किंवा अधिकारी यांना आमंत्रित न करता छोटे खानी कार्यक्रमा घेऊन एक वेगळा पायंडा पाडला. तसेच समाजासमोर वेगळे उदाहरण उभे केले. दरम्यान या मोफत गीझर वाटपासाठी सावदा व परिसरातील गरजू व गरीब महिलांची नाव नोंदणी सुरु आहे.
पुढील येत्या काही दिवसात सावदा परिसरातील गरजू महिलांना घर बसल्या ३०० ते ४०० रुपये रोज कमावता येईल, असे शिलाई काम देण्यात येणार असून यातून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही ताई फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक सपकाळे यांनी सांगितले.