सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त डी. टी. चौधरी यांचे आवाहन
लासूर (साथीदार वृत्तसेवा) ज्येष्ठ नागरिकांनी समाजामध्ये मैत्री भाव निर्माण करावा. आलेल्या पैशांचे व्यवस्थित नियोजन करावे, असे आवाहन सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त डी. टी. चौधरी यांनी केले.
लासूर गावातील श्रीराम मंदिर आवारात नुकतीच श्री नाटेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खान्देश प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष जगतराव बारकु पाटील होते.
याप्रसंगी ज्येष्ठांचे जीवन कसे आनंदमय होईल व त्यांनी कोणती काळजी घ्यावी. आपल्या पुढील जीवनात आनंदमय जीवन जगण्यासाठी स्वतःला मी म्हातारा आहे हे मनातून काढून टाकावे. कुटुंबाशी व नातवंडांशी सलोख्याने वागावे, असेही चौधरी म्हणाले.
कार्यक्रमात एम. बी. महाजन, अरुणकुमार माळी, अरुण धांडे, विजय करोडपती, जयदेव देशमुख, विलास पाटील, जिजाबराव नेरपगारे, राजेंद्र बिडकर, इंजि. विलास पाटील, दिलीप पाटील, रमेश ठाकूर, पी. जी. चौधरी, एस. व्ही. पाटील यांच्यासह लासूर संघाचे अध्यक्ष श्रीराम पालीवाल, उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, सचिव देविलाल बाविस्कर तसेच पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.