चोपडा (साथीदार वृत्तसेवा) ज्येष्ठ नागरिक समस्या, हक्क व अधिकार विषयक कायदेशीर मार्गदर्शन कार्यक्रमाने चोपडा संघाचा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला.
“कायद्याच्या नवीन तरतूदीनुसार आता मुलं – मुली जर आई – वडिल यांचे पालन पोषण करत नसतील तर आई वडिलांना न्यायालयात न जाता प्रांतांकडे अर्ज केल्यास प्रांतांना मुलं -मुली यांना आई – वडिलांच्या पालन पोषणासाठी पोटगी खर्च देण्याचा निर्णय – आदेश देण्याचा अधिकार असल्याचे ” चोपडा न्यायालयाचे विधीज्ञ श्री.एस् .डी.पाटील यांनी सांगितले.
चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन कार्यक्रमात आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ नागरिक समस्या, हक्क व अधिकार विषयक कायदेशीर मार्गदर्शन करतांना पाटील बोलत होते.
सध्या ज्येष्ठ नागरिकांच्या निर्माण होणाऱ्या समस्यां या नैतिक मूल्यांची होणारी घसरण, ज्येष्ठांविषयी अनादर व वाढत जाणारी विभक्त कुटुंब व्यवस्था या सम विविध कारणांमुळे होत असल्याचे निरीक्षण न्यायालयांनी नोंदविल्याचे संघाचे विधी तज्ज्ञ ॲड. व्ही. बी. पाटील यांनी स्पष्ट केले.
१ ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात सेवानिवृत्त प्रा. व्ही. के. पाटील यांनी ज्येष्ठांच्या व्यथा मांडल्या. तर व्ही. एच. करोडपती यांनी ज्येष्ठांच्या समस्या व योजनांविषयी माहिती दिली.
कार्यक्रमास संघाचे अध्यक्ष श्री जयदेव देशमुख, उपाध्यक्ष जे. एस. नेरपगारे, सहसचिव इंजि व्ही. एस. पाटील, कोषाध्यक्ष दिलीपराव पाटील, माजी अध्यक्ष व्ही. एच. करोडपती, माजी उपाध्यक्ष एम. डब्ल्यू. पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुभाष पाटील, मधुकर बाविस्कर, जगन्नाथ पाटील या आजी माजी पदाधिकाऱ्यांसह संघाचे अनेक सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संघाचे सचिव विलास पाटील यांनी केले.
चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाकडून 2 ऑक्टोबर सकाळी १० वा. महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. यावेळी
ज्येष्ठ नागरिक संघ सदस्य उपस्थित होते.