चोपडा (साथीदार वृत्तसेवा) येथील सेवा शिक्षक मंडळातर्फे गत २० वर्षांपासून शिक्षक दिनानिमित्त तालुक्यातील शिक्षकांच्या चांगल्या कामाची दखल म्हणून सेवा शिक्षक मंडळाचे संस्थापक विलास पंढरीनाथ पाटील सर व कुटंबिय यांच्याकडून कै. शांताई व कै. पिताश्री पी. के. पाटील यांच्या तसेच या वर्षापासून जितेंद्र शिंपी परिवारातर्फे प्रताप विद्या मंदिराचे सेवानिवृत्त राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक कै. एस्.आर. शिंपी सर व लोहाणा पेट्रोल पंपाचे दिपूसेठ व बंधू यांच्या परिवारातर्फे कै. ए. जी. लोहाणा सर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या ‘सेवा शिक्षक गौरव’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
पुरस्कारांचे हे २१ वर्ष असून यंदाचे माध्यमिक विषय शिक्षक पुरस्कारार्थी श्री. जगदीश दोधा सोनवणे ( नूतन माध्य. विदयालय, चुंचाळे), प्राथमिक शिक्षक विभाग श्री.विवेक रामभाऊ पाटील ( जि.प. प्राथमिक गणपूर ), विशेष विभाग कला शिक्षक श्री. पंकज आनंदा नागपूरे ( प्रताप विद्या मंदिर, चोपडा ) खासगी प्राथमिक विभाग श्री. श्यामसुंदर सुरसिंग पाटील ( सद्गुरू मुलां-मुलींचे प्राथमिक कन्या विदया मंदिर .गणेश कॉलनी, चोपडा ) यांना ‘सेवा शिक्षक गौरव पुरस्कार’ जाहीर झाले आहेत.
दरवर्षाप्रमाणे वरोल्लेखित ४ विभागातील शिक्षकांची अध्यापनासह इतर क्षेत्रातील क्रियाशीलतेची दखल म्हणून दिले जाणारे हे ‘सेवा शिक्षक गौरव ‘ पुरस्कार या शिक्षकांकडून कोणताही प्रस्ताव न मागविता दिले जातात. सेवामंडळ चोपडाचे संस्थापक विलास पंढरीनाथ पाटील सर, सेवा मंडळ सहकारी नरेंद्र भावे, एच् .बी मोरे, मंगेश भोईटे, संजय बारी हे दरवर्षी तालुक्यातील उत्तम अध्यापन सेवा बजावणाऱ्या शिक्षकांची स्वतः माहिती घेऊन शिक्षक दिनानिमित्त हे पुरस्कार जाहीर करीत असतात. यथावकाश मान्यवरांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान केले जातील, अशी माहिती सेवा शिक्षक मंडळ संस्थापक विलास पंढरीनाथ पाटील दिली आहे.