इगतपुरी तालुक्यातील साकुरमध्ये आयोजन

नाशिक (साथीदार वृत्तसेवा) इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी समृद्धीमार्ग जोड रस्त्यासाठी संपादित करण्यात आल्या आहेत. त्याचा योग्य मोबदला, एमआयडीसीमध्ये स्थानिक तरुणांना प्राधान्य, शेतमालाचे दर हे महत्त्वाचे विषय आहेत. याबाबत नुकत्याच आयोजित शेतकरी संघटनेच्या सभेत चर्चा करण्यात आली. २१ ऑगस्ट रोजी साकुर येथे शेतकरी संघटनेची सभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी अनिल घनवट, सीमा नरोडे, अनिल चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
सभेसाठी अर्जुनतात्या बोराडे, शंकर पुरकर, शंकर ढिकले, बाळासाहेब धुमाळ, रामदास महाराज सहाणे,
तानाजी झाडे, रामदास गायकर, भाऊसाहेब गायकर, पांडुरंग शेंडे यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी शंकरराव पुरकर, रामकृष्ण बोंबले, रामनाथ ढिकले यांच्यासह इगतपुरी तालुक्यातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

‘एमएसपी फॉर दी फ्युचर’वरील परिसंवादासाठी
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बंगळूरूला रवाना
भारत कृषक समाज आणि सॉक्रेटस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘एमएसपी फॉर फ्युचर’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले आहे. दि. २७ ते ३० ऑगस्टपर्यंत हा परिसंवाद चालणार आहे. या शिबिरात देशातील कृषी, पर्यावरण, समाजशास्त्र, अर्थ पुरवठा, उच्चपदस्थ सरकारी अधिकारी आदींसह विविध क्षेत्रातील तज्ञ उपस्थित राहणार आहेत. या परिसंवादामध्ये ‘एमएसपी’ या विषयाची दुसरी बाजू अभ्यासण्याची संधी मिळणार असून, शेतकरी संघटनेची भूमिका मांडण्याची जबाबदारी अध्यक्षांवर असणार आहे.