चोपडा (साथीदार वृत्तसेवा) तालुक्यात बऱ्याच महसूल मंडळात पावसाळ्यात अतिवृष्टी झाली, उर्वरित साऱ्या मंडळात सरकार जी पावसाच्या आकडेवारी घेते ती दररोज सकाळी ७:०० वाजता घेतली जाते. त्या आधारे अतिवृष्टी सदरात बसली नाही. बऱ्याच वेळेस दुपार नंतर चे चोवीस तासात ६५ मी मी पाऊस पडतो तो दोन वेगळ्या दिवसात मोजला गेल्याने अतिवृष्टी कागदावर दिसत नाही .अशीअतिवृष्टी दोन तीन वेळेस झाली त्यानंतर देखील सततच्या पावसाने सारेच पिकांचे नुकसान झाले आहे.
जे थोडे फार उत्पादन येण्यासारखे दिसत होते ते देखील गेल्या तीन दिवसात झालेल्या वादळी वाऱ्यासकट आलेल्या पावसाने हिरावले.त्यात देखील साऱ्याच शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही किंवा ज्यांनी काढला ,त्याची देखील ७२ तासात तक्रार नोंदणी झाली असेलच असे नाही.पण नुकसान साऱ्यांचेच झाले आहे.अती वेगाने कापसाची फुल फुगडी पूर्ण गळून गेली,थोडेफार जे पक्व आहेत त्यात देखील बोंड अळी ने या ढगाळ वातावरण मुळे नुकसान सुरू झाले आहे.ही वास्तवता आहे.
ओला दुष्काळाचे ट्रिगर काहीही असले तरी नुकसान मात्र साऱ्याच आहे. दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने सरसकट पंचनामे करण्यात वेळ न घालता, गरज असल्यास प्रातिनिधिक पंचनामा करून लवकर निर्णय घेवून नुकसान भरपाई मंजूर करून उपलब्ध करून द्यावी अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.लवकर निर्णय न झाल्यास शेतकरी मोठे आंदोलन उभारतील असे देखील निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी एस. बी. पाटील, प्रा. प्रदीप पाटील, अजित पाटील, कुलदिपसिंग पाटील, प्रफ्फुलसिंग राजपूत, डॉ. सुभाष देसाई, समाधान पाटील, सुभाष पाटील, प्रा. छबिलाल सोनवणे, समाधान पाटील, महेंद्र बोरसे, सतीश पाटील, किशोर पाटील, सुनील पाटील, रवींद्र सोनवणे, पाटील, योगेश पाटील यांच्या निवेदनावर सह्या आहेत.