चोपडा (साथीदार वृत्तसेवा) जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यातील मजरेहोळ गावाजवळ आज सकाळी चोपडा-नाशिक शिवशाही बस (mh09am1289) आणि चारचाकीचा अपघात झाला.
या अपघातात चार चाकीचे टायर फुटल्याने नियंत्रण बिघडले आणि तीन जण ठार झाले. त्यातील एक नाशिक उपनगर येथील रहिवासी असून, तर दोन जण निजामपूर येथील आहेत. याबद्दल अधिक चोपडा डेपो मॅनेजर महेंद्र पाटील यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि एसटी बस यंत्रणा अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत.