चोपडा (साथीदार वृत्तसेवा) शहरातील श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर श्रीरामनगर येथे आज , ३० ऑगस्ट रोजी श्रावण कृष्ण अष्टमी हा दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा करण्यात येत आहे. सायंकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत भजनाचा कार्यक्रम होणार असून रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्म सोहळा संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमास कोरोना नियमाचे पालन करून उपस्थितीचे आवाहन समस्त तेली समाज चोपडा व श्री संत जगनाडे जगदीश गोपाल गोशाळा व अनुसंधान संस्था चोपडा यांनी केले आहे.
