संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर येथे मिळाला आरतीचा बहुमान
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा, संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर येथे एसटी कर्मचारी संघटनेचे नेते श्री अनंत मोतीलाल चौधरी व त्यांच्या धर्मपत्नी सौ. भावनाताई अनंत चौधरी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी चौधरी दाम्पत्यास आरती करण्याचा बहुमान देण्यात आला.
कोरोनाच्या संकटकाळात एस टी महामंडळात कर्तव्यदक्षपणे सेवा दिल्याने चोपडा तेली समाजातर्फे करोनायोद्धा म्हणून श्री अनंत चौधरी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्याबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री के. डी. चौधरी साहेब, उपाध्यक्ष श्री. टी. एम. चौधरी सर यांनी त्यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी हभप गोपीचंद महाराज, संस्थेचे सहसचिव श्री प्रशांत सुभाष चौधरी त्यांच्या धर्मपत्नी सौ. नम्रता प्रशांत चौधरी, निशांत चौधरी, श्रीकांत चौधरी, प्रकाश श्रावण चौधरी विश्वस्त श्री नारायण पंडित चौधरी, हभप तेजस महाराज, लक्ष्मण महाराज, ज्ञानेश्वर आप्पा नेरकर, विश्वस्त श्री देवकांत चौधरी, मदन मिस्तरी, अशोक भाईदास पाटील गौरव पाटील, जगदीश मिस्त्री आदींसह बालगोपाळ मंडळी उपस्थित होते.