शहादा – (साथीदार वृत्तसेवा) येथील मित्तल फायर्बसचे सेक्रेटरी श्यामलाल रतनलाल ललवानी यांची मुलगी आणि मुलगा यांनी इंजिनियरिंग व अर्किटेक्ट मध्ये बाजी मारली. मयुर श्यामलाल ललवानी यांनी काँम्प्युटर इंजिनियरिंग तिसऱ्या वर्षात ९६ % गुण मिळवून उत्तीर्ण झाले, तर सोनाली श्यामलाल ललवानी हिने अर्किटेक्टच्या चौथ्या वर्षात ९७ % गुण मिळवून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली.

या यशाबद्दल शहादा परिसरात दोघांचे संपूर्ण समाजात कौतुक होत आहे. तसेच भारतीय जैन संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष भवरलाल जैन व संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले.