चोपडा (साथीदार वृत्तसेवा)
येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष श्री.विजय करोडपती यांची नात व पंकज बडगुजर यांच्या सुकन्या कु.डॉ.सृष्टी हिने राजीव गांधी विद्यापीठ हेल्थ & सायन्स अंतर्गत शासकीय आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज म्हैसूर मधून वैद्यकीय क्षेत्रात एम. डी. प्रथम वर्षात विद्यापीठातून प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला.
ही बाब करोडपती परिवारासह शिक्षक समाज व सगळ्यांसाठी भूषणावह, आनंददायी तसेच अभिमानाची असल्याने तिचे अभिनंदन व सत्कार करून तिला सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा व शुभाशीर्वाद देण्यात आले.

येथील ज्येष्ठ नागरिक संघ व फेस्कॉम शाखेच्या वतीने जिल्हा संघटक प्रमोद डोंगरे, अध्यक्ष जे. एन.देशमुख, माजी फेस्कॉम तालुका सचिव अनिलकुमार पालीवाल व इतरांनी डॉ. सृष्टीच्या या यशाचे कौतुक केले असून अभिनंदन केले आहे.
