• Sat. Jul 5th, 2025

शिक्षक दिनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक सन्मान सोहळा

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) श्री स्वामी समर्थ सार्वजनिक वाचनालय आयोजित चोपडा तालुक्यातील १७ शिक्षकांचा गौरव सोहळा शिक्षक दिनी संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पी बी पवार सर (मा प्राचार्य) होते. यावेळी प्रा संदीप पाटील, प्रा जगदीश पठार उपस्थित होते.
सुरुवातीस महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी चोपडा तालुक्यातील वेगवेगळ्या (जिल्हा परिषद, इंग्रजी माध्यम, माध्यमिक, महाविद्यालय, आश्रमशाळा आदी स्तरावरील माध्यमाच्या शिक्षकांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

प्रा संदीप पाटील यांनी आपल्या भाषणात शिक्षणाचे पूर्वीचे आणि आधीचे शिक्षणाचे महत्व यावर मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात नानासाहेब यांनी खरा शिक्षकांचे शिक्षणक्षेत्रात स्थान किती महत्वाचे आहे. शिक्षक हा भावी पिढीचा आधारस्तंभ आहे असे म्हटले. प्रास्तविक अश्विनी किरण बडगुजर यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वाचनालयाचे अध्यक्ष किरण विठ्ठल बडगुजर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीवितेसाठी प्रा संदीप पाटील, प्रा मुकेश पाटील प्रा निलेश पाटील आदीसह विद्यार्थिनीनी सहकार्य केले.

…यांचा झाला सन्मान
श्री.आधार पान पाटील, जि.प.शाळा कर्जाणे, डॉ. शैलेश कुमार वाघ-ASC College चोपडा, श्रीमती भावना पाटील-कन्याशाला अडावद, श्री. प्रभाकर पाटील, जि प शाळा खाचणे, श्री. शैलेंद्र चव्हाण, शा. शी. पाटील विद्यामंदिर चहार्डी, श्रीमती मनीषा पाटील, जि प शाळा घुमावल, श्री. किशोर पाटील, जि प शाळा देवगाव, श्री. सचिन पाटील, प. ज. ने. विद्यालय अकुलखेडे, श्री. एल एच पाटील, विद्या भरती माध्यमिक विद्यालय विरवाडे, श्री. संजय बारी, महिला मंडळ शाळा चोपडा, श्री. किरण पाटील, प्रताप विद्या मंदिर चोपडा, श्री. भालचंद्र पवार, आश्रमशाळा सत्रासेन, इब्राहिम तडवी, पंकज ग्लोबल चोपडा, श्री. संजीव शेटे, जि प शाळा चौगाव, श्री. राकेश विसपुते, विवेकानंद विद्यालय चोपडा, श्री. व्ही. सी. महाजन, म. गांधी विद्यालय लासुर, श्री. विनोद पाटील, कस्तुरबा शाळा चोपडा.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.