चोपडा (साथीदार वृत्तसेवा) श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा व महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान चोपडा यांचे संयुक्त विद्यमाने संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर येथे 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश तेली महासंघ जळगाव जिल्हाध्यक्ष श्री के. डी. चौधरी सर होते. त्यांच्या शुभहस्ते समाजातील शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
यावेळी चोपडा महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे प्राचार्य श्री अनंत लालचंद चौधरी व त्यांच्या धर्मपत्नी सौ रत्नाताई चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. चोपडा प्रताप विद्या मंदीराचे माजी मुख्याध्यापक राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त टी .एम. चौधरी सर त्याचप्रमाणे श्री नारायण पंडित चौधरी, श्री सुनील हिरालाल चौधरी, श्री संजय कौतिक चौधरी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा या संस्थेतर्फे दरवर्षी दिला जाणारा आदर्श संताजी सेवा पुरस्कार जिल्हास्तरीय पुरस्कार तेली समाजाचे विश्वस्त तथा माजी अध्यक्ष व कस्तुरबा हायस्कूलमधील विद्यार्थीप्रिय शिक्षक श्री संजय कौतिक चौधरी यांना जाहीर करण्यात आला. संजय चौधरी यांचे उपस्थितांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. सदरचा पुरस्कार संताजी महाराज पुण्यतिथीवेळी एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात येणार असल्याचे के. डी. चौधरी यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे सहसचिव तथा प्रदेश तेली महासंघाचे चोपडा तालुका अध्यक्ष श्री प्रशांत सुभाष चौधरी यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमास उपस्थित सर्व शिक्षकांच्या हस्ते आरती करण्यात आली.
जगनाडे गो शाळेत पोळा साजरा
संत जगनाडे जगदीश गोपाल गोशाळा व गो अनुसंधान संस्था चोपडा तर्फे 6 सप्टेंबर 2021 रोजी पोळा हा सण साजरा करण्यात आला. या वेळी बैलांची, गाईंची व गोवंशान्ची आन्घोळ करून त्यांना सजवण्यात आले. त्यांची पूजा करून पुरणाची पोळी खाउ घालण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री देवकांत के. चौधरी व सौ धनश्री देवकांत चौधरी यांनी पूजन केले. यावेळी श्री देवकान्त चौधरी यांनी समस्त शेतकरी बांधवांना शुभेच्छा देऊन गोवंशाचे जतन व संवर्धन करण्याचे आवाहन केले.
