फेरीवाले व विनाकारण वाहने रस्त्याच्या कडेला उभी असतात नागरिकांना चालताना मोठा मनस्ताप
ठाणे (अमित जाधव-प्रतिनिधी)
ठाणे महापालिका हद्दीतील दिवा शहरात अनेक रस्त्यांचे नूतनीकरण करत असताना नागरिकांना पर्यायी रस्ता नाही त्यामुळे दिवा आगासन रोड मुख्य रस्त्यावर चालताना नागरिकांच्या नाकी नऊ येत आहे.वेळोवेळी मागणी करून सुद्धा दिव्यात फेरीवाल्यांवर व विनाकारण वाहन रस्त्यात उभी करणाऱ्यांवर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही भविष्यात रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यावर देखील हीच परिस्थिती असेल असे यावरून दिसून येत आहे ठाणे वाहतूक पोलिस विभागाला या कडे लक्ष देण्यास अजिबात वेळ नाही त्यामुळं त्यामुळे दिवावासीयांन मध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी आहे मुख्यरस्त्यावर कुठेच वाहतूक पोलीस दिसत नाहीत यामुळं मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रस्त्याच्या कडेला अनेक नागरिक आपली वाहने पार्क करून वाहतूक कोंडी निर्माण करतात त्यात फेरीवल्यानि पूर्णच फुटपाथ व्यापल्याने व काही दुकानदारांनी आपले बस्तान बाहेर ठेवल्याने नागरिकांना चालताना मोठ्या प्रमाणात मनस्थाप होत आहे.ठाणे महापालिका सहायक आयुक्तवर अनधिकृत फेरीवल्यानं केलेल्या हल्याचे तरी गंभीर दखल घेऊन आशा फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करावी व जे अनेक फेरीवाल्यांकडून काही चिरीमिरी घेतात त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी जेणे करून अनेक रस्ते व फुटपाथ मोकळे होतील व नागरिकव चालताना मोकळा श्वास सोडतील अशी आशा सर्व समान्य दिवेकरांनी व्यक्त केली