प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांचे आवाहन
जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) दरवर्षी 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मात्र सद्यस्थितीत राज्यात कोविड 19 (कोरोना) चा प्रादुर्भाव असल्याने शासन आदेशानुसार एकत्रित जमण्यावर, सामुहिक कार्यक्रम करण्यावर मर्यादा आहेत.
या वर्षीचा जागतिक आदिवासी दिन राज्य शासनाचे व स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार साजरा करणेबाबत मार्गदर्शक सूचना आहेत. त्यानुसार यावर्षीचा जागतिक आदिवासी दिन हा अत्यंत साध्या पध्दतीने कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांचे उपस्थित साजरा करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील आदिवासी बंधू, भगिनींनी आपण राहत असलेल्या ठिकाणी जागतिक आदिवासी दिन साजरा करावा तसेच सामाजिक संघटना व संस्था, शाळा, वसतिगृहे, आश्रमशाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांनी शासनाच्या सुचनांचे तंतोतंत पालन करुनच जागतिक आदिवासी दिन साजरा करावा.
आदिवासी बंधु,भगिनींना जागतिक आदिवासी दिनानिमित्त प्रशासनाच्यावतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात येत असल्याचे विनिता सोनवणे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.