दैनिक राशिमंथन, १६ जून २०२० मंगळवार
मेष राशी
आज लोकांशी तुमच्या खाजगी गोष्टी बोलू नका. घरगुती पातळीवर काही अडचणी निर्माण होऊ शकतील. तुमची कलात्कम आणि सर्जनशील क्षमता यामुळे तुम्ही कौतुकाचे धनी व्हाल.
वृषभ राशी
अतिरिक्त कामाचा बोजा घेऊ नका – थोडी विश्रांती घ्या. काही अटकळी आणि अनपेक्षित आर्थिक लाभ होतील. कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. मनासारख्या घटना घडतील. गुप्त माहिती उघड करू नका.
मिथुन राशी
थोडा आराम करा आणि सात्विक अन्नसेवन केल्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल – त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. नवीन प्रकल्पात हात घालण्याअगोदर तुम्हाला त्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना आज समजून घ्या.
कर्क राशी
दिवसाची सुरवात तुम्ही योग साधनेने करू शकतात. पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. या लोकांच्या भाऊगर्दीमध्ये तुम्ही नशीबवान आहात हे तुम्हाला कळून चुकेल. प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वयन करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे. आज तुम्ही ऑफिस मधून परत येऊन आपले आवडते काम करू शकतात. यामुळे मनाला शांती मिळेल.
सिंह राशी
खर्च वाढतील, अनावश्यक खर्च टाळा. मित्र आणि कुटुंबातील सदस्य आपणास साहाय्य आणि प्रेम देतील. अापली खाजगी आणि गुप्त माहीती तुम्ही उघड करु नका. तुमच्यात सकारात्मक बदल येतील.
कन्या राशी
ध्यानधारणा योगा करून एखादे छानसे संगीत ऐका. त्यामुळे उत्साह वाढेल आपली उर्जा दिवसभर कामात येईल. आज तुम्हाला कुणी अज्ञात स्रोताने पैसा प्राप्त होऊ शकतो. ज्यांची मदत घेऊ शकता अशा लोकांशी संवाद साधा.
तुला राशी
आपले संबंध चांगले, सौहार्दपूर्ण ठेवण्यासाठी प्रयत्न करा. जर तुम्ही नवीन व्यावसायिक भागीदारीचा विचार करत असाल, तर कोणताही शब्द देण्यापूर्वी सर्व महत्त्वाच्या घटकांची माहिती जमा करा. आपल्या सहचरासोबत असणे कसे असते याची तुम्हाला आज जाणीव होईल.
वृश्चिक राशी
आरोग्य चांगले असेल. तुमच्या वडिलधार्यांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धन लाभ करवून देऊ शकते. आज तुम्हाला स्थितीला समजून व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे. तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आज अनुभवु शकाल, त्यामुळे आज तुम्ही भावूक व्हाल.
धनु राशी
तुम्ही आनंद उपभोगू शकाल. अध्यात्मिक व भावनिकता अधिक असेल. तुमचे तुम्हालाच पुन्हा नव्याने उभारी मिळाल्यासारखे वाटेल. व्यवहारात तुम्हाला नफा होईल. सहकुंटूब सामाजिक कार्यात सहभागी होण्याने अधिक आनंद मिळेल. आपण आज आत्मसात केलेले, अधिकाधिक ज्ञान तुमच्या व्यक्तीमत्त्वाला वेगळीच धार देईल.
मकर राशी
आराम करु शकाल. आर्थिक स्थिती सुधारेल. तुमच्या मनात कामाच्या ताणाचे विचार असले तरी आनंदी राहाल. जोडीदार भागीदार यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी बोलू शकतात.
कुंभ राशी
तुम्ही इतरांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्याल. तरुणाईचा सहभाग असणा-या उपक्रमात स्वत:ला गुंतविण्यासाठी चांगली वेळ आहे. व्यवसायातील आपल्याला कौशल्य दाखवावे लागेल. अपेक्षित फळासाठी तुम्ही तुमचे सारे लक्ष प्रयत्नावर केंद्रित करावे.
मीन राशी
तुमचा मूड चांगला असेल. नियोजित काम होऊन तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. त्यामुळे निश्चितच तुम्हाला बरे वाटेल. एखादी चांगली आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. कामामध्ये सातत्य ठेवावे.