• Wed. Feb 4th, 2026

युडीआयडी-आधार संलग्नतेसाठी 28 जानेवारीपूर्वी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन



जळगाव (जिमाका वृत्तसेवा) जिल्ह्यातील विशेष सहाय्य योजनेतंर्गत संजय गांधी योजना / श्रवणबाळ योजना / इंदिरा गांधी योजनेतंर्गत शासनाने लाभार्थ्यांना ऑनलाईन सुविधे अंतर्गत अनुदान वितरीत करण्याचे निश्चित केलेले आहे. त्या अनुषंगाने सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना शासन निर्णय दि. 20 ऑगस्ट 2025 नुसार या योजनेचा लाभ सुरु ठेवण्यासाठी लाभाच्यर्थ्यांचे युडीआयडी कार्ड आधार कार्डशी संलग्न करणे अनिवार्य आहे.

ज्या लाभार्थ्यांना अनुदानात वाढ झाल्यापासून 2500 रु. अर्थसहाय्य मिळत आहे अश्या दिव्यांग लाभाथ्यांचें युडीआयडी कार्ड देखील MAHADBT या पोर्टलवर संलग्न करणे अनिवार्य आहे. तरी ज्या दिव्यांग लाभार्थ्यांनी अदयाप कार्यालयात आवश्यक कागदपत्र जसे दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड, युडीआयडी कार्ड, बँकपासबुक च्या छायांकीत प्रती जमा केलेले नाही त्यांनी दि. 28 जानेवारी 2026 पुर्वी संजय गांधी शाखा, रेल्वे स्टेशन रोड, जळगाव येथे तात्काळ जमा करावे.

शासन निर्देशानुसार विहित मुदतीत कागदपत्रे सादर न करता पडताळणी पूर्ण न करण्या-या – लाभार्थ्यांची माहिती अद्यावत केली जाणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन संजय गांधी योजना, नगपालिका क्षेत्राच्या तहसिलदार, रुपाली काळे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.