चोपडा (साथीदार वृत्तसेवा) जागतिक स्मृती दिनाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळाच्या पहिल्यावहिल्या कार्यक्रमाचे आयोजन जिजाऊ जिममध्ये करण्यात आले.
अमळनेर तालुक्यातील स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. मंजिरी कुलकर्णी या प्रमुख वक्त्या होत्या. त्यांनी विशिष्ट वयानंतर स्मृती भ्रंश कसा होतो त्याची कारणे व त्यावरील उपाय यावर महत्त्वपूर्ण माहिती दिली. ज्येष्ठ महिलांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्यांचे उत्तमप्रकारे समाधान केले.
या कार्यक्रमाची सुरवात साने गुरुजींच्या प्रार्थनेने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षपद सौ.कांचनताई शहा यांनी भूषविले. प्रास्ताविक प्रा. शीला पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन मंडळाच्या उपाध्यक्षा सौ.वसुंधरा लांडगे मॅडम यांनी केले. आभार प्रदर्शन सौ रत्ना भदाणे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या नियोजनात कार्यकारी सदस्यांचा सहभाग चांगला होता. कार्यक्रमाच्या शेवटी पसायदान म्हटले गेले.
यशस्वीतेसाठी मंडळाच्या अध्यक्षा सौ. भारती बी. पाटील, गायत्री भदाणे, छाया पाटील, भारती गाला, प्रा. उषा पाटील, सुरेखा बाविस्कर, चंद्रकला पाटील, सुनंदा चौधरी, पद्मजा पाटील, अरुणा शिरसाळे यांनी सहभाग घेतला होता.